शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी दिलेले योगदान प्रत्येकाच्या स्मरणात राहील, असे प्रतिपादन महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमावेळी सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, उपआयुक्त सचिन ढोले, संदिप खोत, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर नेहरूनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला आयुक्त पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.