शबनम न्युज | पंढरपूर
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश सरचिटणीस खाजाभाई शेख यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. पक्ष वाढीसाठी त्यांनी हा दौरा सुरू केला असून, विविध ठिकाणी भेटी देऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. यादरम्यान खाजाभाई शेख यांचा सन्मान सत्कार ही होत आहे.दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महाराष्ट्र प्रदेश संघटक, पंढरपुर नगरपालिके चे मा.नगराध्यक्ष सुनील सर्वगोड यांच्या हस्ते खाजाभाई शेख यांचा पंढरपूर येथे सत्कार करण्यात आला.
या वेळी अरविंद कांबळे (पंढरपुर) सोलापुर जि. उपाध्यक्ष , समाधान आठवले पंढरपुर ता.उपाध्यक्ष ,बाबा गाडे मोहळ ता. सरचिटणीस ,शेखलाल नदाफ व अप्पालाल नदाफ वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर अल्पसंख्याक आघाडी ,आदि उपस्थित होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) अल्पसंख्याक आघाडी पश्चिम महाराष्ट्र मध्ये पक्ष वाढीसाठी व येणाऱ्या काळात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांविषयी तसेच सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली.