शबनम न्युज | मुंबई
मुंबईत आज दोन दसरा मेळावे होत आहे. एक बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानात शिंदे गटाचे तर दुसरे शिवाजी पार्क वर उद्धव ठाकरे गटाचे (शिवसेना) यांच्या मेळाव्यास नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मेळाव्यात काय भाषण करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान शिंदे गटाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे व्हिडीओ क्लिप दाखवून भाषण करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणाची जय्यत तयारी केली असून खुद्द मुख्यमंत्री शिंदे आज गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून काही व्हिडिओ फूटेज दाखवून उद्धव ठाकरेंवर घणाघात करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Advertisement