शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
ललित कलांसाठी समर्पित भावनेने कार्य करणारी अखिल भारतीय संस्था म्हणजे संस्कार भारती, संस्कृती आणि राष्ट्रप्रेम कला सादरीकरणातून समाज मना पर्यंत पोहोचण्यासाठी अखंड कार्य करणारी संस्था म्हणजेच संस्कार भारती.. पश्चिम प्रांत अंतर्गत कार्यरत असणाऱ्या पिंपरी चिंचवड समिती च्या कार्यकारिणीचा विस्तार व नवनिर्वाचित पदनियुक्ती समारंभ खेळीमेळीच्या वातावरणात नुकताच निगडी येथील स्वा. सावरकर सदन येथील सभागृहात पार पडला.
यावेळी संस्कार भारती पश्चिम प्रांताचे श्री. सतीश कुलकर्णी (महामंत्री – संस्कार भारती पश्चिम प्रांत) व श्री.अभय पटवर्धन (खजिनदार– संस्कार भारती पश्चिम प्रांत) सौं. विशाखा कुलकर्णी (साहित्य विधा- संयोजिका पश्चिम प्रांत )संस्कार भारती – पिंपरी चिंचवड यांच्या उपस्थितीत समितीचे अध्यक्ष – सचिन काळभोर आणि सचिव लीना आढाव यांनी नवीन कार्यकारीणीचा विस्तार जाहीर करण्यात केला.
यावेळी सर्व कलासाधकांचा समितीतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. समितीच्या मुख्य कार्यकारिणी मध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे बासरी वादक – श्री. हिमांशू नंदा, गावठाण ते महानगर हा पिंपरी चिंचवड चा इतिहास लिहिणारे – श्री. श्रीकांत चौगुले, वीरगळींचे अभ्यासक – श्री. अनिल दुधाने, ज्येष्ठ कलाकार सुरेश वरगंटीवार, प्रतिभावंत चित्रकार श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर , रंगकर्मी माधव जोगळेकर, संस्कार भारती मध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असणारे श्री. हर्षद कुलकर्णी, भरतनाट्यम गुरु सौं. सायली काणे यांसारख्या अनेक दिग्गज मान्यवर कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन कार्यकारीणी पुढील प्रमाणे-
मुख्य कार्यकारिणी
• उपाध्यक्ष – श्री.हर्षद कुलकर्णी
• उपाध्यक्ष – श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर
• सहसचिव – सौ. प्रणाली महाशब्दे
• संपर्क मंत्री – सौ. सायली केदार काणे
• कोष प्रमुख – सौ. प्रचिती भिष्णूरकर
• कार्य कारिणी सदस्य – श्री. सतीश वर्तक
• कार्य कारिणी सदस्य – श्री. हिमांशू नंदा
• कार्य कारिणी सदस्य – नेहा दाते (तांत्रिक बाजू )
विधा संयोजक / सहसंयोजक
साहित्य –
• १. सौ. प्रणिता बोबडे – संयोजिका
• २. सौ. शुभदा दामले – सह संयोजिका
• ३. श्रीमती.प्रिया जोग – सह संयोजिका
नाट्य –
• १. ज्योती आपटे – संयोजिका
• २. माधव जोगळेकर – सहसंयोजक
• ३. स्वप्निल शिंदे – सहसंयोजक
नृत्य –
• १. सौ. वरदा वैशंपायन – संयोजिका
• २. सौ. सुजा दिनकर – सह संयोजिका
• ३. सौ. स्वप्ना रत्नाळीकर – सह संयोजिका
संगीत –
• १. सौ. रागिणी कौसडीकर – संयोजिका
• २.सौ. शर्मिला शिंदे – सह संयोजिका
• ३.श्री. सारंग चिंचणीकर – सहसंयोजक आणि संगीत मासिकं प्रमुख
चित्रकला –
• १. श्री.धीरज दीक्षित – संयोजक
• २. श्री. रमेश खडबडे – सहसंयोजक
• ३.सौ. सारिका सूर्यवंशी – सह संयोजिका
रांगोळी –
• १. सौ. अनिता रोकडे – संयोजिका
• २. सौ. सुनीता कुलकर्णी – सह संयोजिका
• ३. सौ. योगिनी नरुटे – सह संयोजिका
प्राचीन कला व ऐतिहासिक वास्तु –
• १.श्री. अनिल दुधाने – संयोजक
• २.श्री. श्रीकांत चौगुले – संयोजक
• ३. श्री. सुरेश वरगंटीवार- सहसंयोजक
बालविधा –
• १.सौ. शोभा पवार – संयोजिका
• २. स्मिता देशपांडे – सह संयोजिका
सोबत नृत्य मासिक सभा प्रमुख म्हणून खालील भगिनींची समिती तर्फे निवड करण्यात आली आहे
• १.राजश्री धोंगडे – निगडी
• २. श्रद्धा साळवी – भोसरी
• ३. सायली देवधर – यमुनानगर
• ४. अमृता गणेश – पूर्णा नगर
• ५. मिलिंद रणपिसे, शिल्पा भोमे – पिंपरी
• ६.संयोगिता पाटील सुर्यवंशी – थेरगाव
• ७. भावना गौड – रावेत
• ८. स्वप्ना रत्नाळीकर – पिंपळे सौदागर
• ९. वैष्णवी घोटकर सहस्रबुद्धे – चिंचवड गाव
• १०.स्नेहल सोमण , वरदा वैश्यम्पायन – शाहू नगर
• ११. प्रमोदिनी तपकीरे – देहुगाव
• १२. सायली काणे – कस्पटे वस्ती (वाकड)
यावेळी पश्चिम प्रांताचे महामंत्री श्री. सतीशजी कुलकर्णी यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या समारंभाचे सूत्रसंचालन सौं. शुभदा दामले, प्रास्ताविक सौं. लीना आढाव यांनी केले तर समितीचे अध्यक्ष श्री. सचिन काळभोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.