शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील राष्ट्रवादीचे युवा नेते अमन भैया शेख व श्री गणेश युवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे शहर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिनानिमित्त वृक्ष व मास्क वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांमध्ये झाडे लावा, झाडे जगवा याची जनजागृती व्हावी, निसर्ग प्रेम वाढावे, नैसर्गिक उपयोगीता सर्व सामान्य लोकांना माहीत व्हावी, तसेच नागरिकांचे आरोग्य चांगले व्हावे, याकरिता पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना लक्ष्मी नगर लेन नंबर एक पिंपळे गुरव येथे वृक्ष रोपटे व मास्क चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम श्री गणेश युवा मित्र मंडळ व अमन भैया शेख यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. यावेळी परिसरातील अनेक नागरिक ज्येष्ठ महिला, मुले, युवक उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितितांचे अमन भैया शेख यांनी आभार व्यक्त केले.