शबनम न्युज | पिंपरी
मेडिक्वीन मेडिको पिजंट व अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी सौन्दर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मेडिक्वीन मेडिको पिजंट तर्फे डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर ( कार्यकारी अध्यक्ष ) आणि डाॕ प्राजक्ता शहा ( सेक्रेटरी ) यांच्याकडून विविध वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी सौन्दर्य स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. हे चवथे वर्ष असून यात ॲलोपॅथी आयुर्वेद ,डेंटल ,होमिओपॅथी, फिजिओथेरपी अशा सर्व डॉक्टरांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून महिला डॉक्टर सहभाग नोंदवतात.
सदर स्पर्धेमध्ये प्राधिकरण निगडी, पुणे येथिल डॉ. नेहा सावंत, कन्सल्टींग फिजिओथेरपिस्ट ह्यांनी सेकंड रनर अप हे पुरस्कार जिंकले आहे. डॉ. नेहा सावंत, ह्या वैद्यकीय क्षेत्र मध्ये १६ वर्षे पासुन कार्यरत आहेत आणि क्लिनिक बरोबरच सोसायट्या, कार्यालये आणि कॉर्पोरेटस् ह्यामध्ये शिबिरे मधुन त्या कॅन्सर, मधुमेह, थायरॉईड आणि महिलांचे आरोग्य ह्या वर समाजमध्ये जागरुकता आणण्यासाठी कार्यरत आहेत.
मेडिक्वीन हि केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून यामधे सहभागी डाॕक्टरांचे सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रातील काम, कलागुण, फिटनेस, छंद, व्यक्तिगत यश या अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. डाॕ प्रेरणा बेरी – कालेकर यांच्या संकल्पनेतून मेडिक्वीन हि स्पर्धा साकारली आहे
मागील वर्षी या कार्यक्रमाची नोंद इंडिया बुक आॕफ रेकाॕर्डस्, एशिया बुक आॕफ रेकाॕर्डस् आणि मेडीक्वीन एक्सलन्स अवॉर्ड सामाजिक कार्य या अंतर्गत झाली आहे.
या वर्षी सर्व मेडिक्वीन डाॕक्टर महिला आरोग्य अंतर्गत कॕंसर या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात काम करणार आहेत. अभिनेते आदिनाथ कोठारे, अनुप अविनाश मोरे सरचिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते . डाॕ नंदिता पालशेतकर यांनी सर्व पठृमहिला डाॕक्टरांना मार्गदर्शन केले.
या वर्षीच्या या कार्यक्रमाचे अंतिम फेरीचे परीक्षक डॉ. मेधा भावे, पूजा वाघ आणि केदार गायकवाड तर तेजपाल वाघ सेमी फायनल आणि सामाजिक कार्य यु एस ए तील डॉ. जया दप्तरदार म्हणून यांनी काम बघितले.