पुणे : शबनम न्यूज ( वृत्तसंस्था )
पुण्यातील २६ वर्षीय इराणी विद्यार्थ्याला सार्वजनिक सेवकावर हल्ला करणे, बेकायदेशीरपणे राहणे आणि रॅश ड्रायव्हिंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह वली बोर अली अकबर अब्दुल रहमान असे आरोपीचे नाव असून तो शनिवारी सकाळी औंध येथील डी मार्ट रोडवरून सांगवी फाट्याकडे दुचाकीने जात असताना त्याला पोलिस चौकी दिसली आणि त्याने “पलायनासाठी यू-टर्न घेतला” व , एका महिलेने चालवलेल्या दुसर्या दुचाकीशी त्याची धडक झाली आणि दोघेही जमिनीवर पडले.
जवळच असलेले पोलिसांनी जेंव्हा विचारणा केली असता इराणी विद्यर्थ्याने पोलीस कर्मचार्यांशी “वाद घालण्यास” सुरुवात केली आणि त्यांच्यापैकी एक पोलीस कर्मचारी बाळकृष्ण महाडिक यांना “मारले”.
सांगवी वाहतूक विभागात सहाय्यक-निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले महाडिक यांना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितलेआरोपी हा इराणमधील सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील असून तो डॉ डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्समध्ये शिकत असल्याचे आढळून आले.त्यास पोलिसांनी अटक केली आहे,