जगतापांच्या बालेकिल्यातून राष्ट्रवादीचा परिवर्तनाचा एल्गार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:
आज चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मासिक बैठक शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चिंचवड विधानसभेचे निरीक्षक आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दिसून आलेला उत्साह हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आत्मविश्वास भरणारा ठरला आहे.
या बैठकीत बोलताना चिंचवड विधानसभेचेअध्यक्ष निरीक्षक आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले की भाजपने आमदार लक्ष्मण जगताप हे हयात असताना व प्रकृतीशी झुंज देत असताना चिंचवड विधानसभेत पोट निवडणूक लागणार या दृष्टीने पोटनिवडणुकीची तयारी चालू केलेली होती. ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे राजकारण करणे हे कुठल्या राजकीय संस्कृतीला धरून आहे, असा घणाघात यावेळी त्यांनी भाजपवर केला. तसेच राष्ट्रवादी हाच या निवडणुकीत नैसर्गिक दावेदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.व राष्ट्रवादीचा च उमेदवार या निवडणुकीत विजयी होईल असा विश्वास देखील बोलून दाखवला.
तसेच गेले ३ दशके राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी या शहराचा कायापालट केलेला आहे व मोलाचे योगदान दिले आहे, अनेक कार्यायकर्ठित्कायांची मोठी फळी घडवलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदार या शहरात व चिंचवड मतदार संघात मोठ्या संख्येने आहे, म्हणून ही जागा राष्ट्रवादीलाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तरीही महाविकास आघाडीतील शिर्षस्थ नेते अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी म्हटले आहे.
बैठकीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी बोलताना, येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे महत्वाचे असल्याचे सांगत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात उत्साह भरला आहे. ज्याप्रमाणे मावळची निवडणूक सुनील शेळके यांनी प्रचंड मताधिक्याने जिंकली तसाच चिंचवड निवडणुकीत देखील विजय मिळवायचा आहे. असेही त्यांनी सांगितले. महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी आपल्या भाषणात, चिंचवड निवडणुकीसाठी सर्वांनी तयारीला लागण्याचे आवाहन केले तसेच ही निवडणूक आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे असे प्रतिपादन केले.
एकंदरीतच चिंचवड पोट निवडणुकीच्या निमित्ताने खुद्द पिंपळे गुरव मधेच राष्ट्रवादीने मोर्सुचे बांधणीस सुरुवात केलेली आहे. कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी झटून कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.