शबनम न्युज | नागपूर (वृत्तसंस्था)
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले 7000 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे.
Advertisement
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 8 वाजता नागपुर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडवाले यांना 14071 तर गाणार यांना 6309 मते मिळाली. एकूण 7 हजाराहून अधिक मतांनी अडवाले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, पहिल्या फेरीत अडवाले यांनी निर्णयाक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला.
Advertisement