पिंपरी चिंचवड | शबनम न्यूज
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कचरा वाहतूक व्यवस्थेबाबत आज सकाळी पाहणी करण्यात आली.अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ह प्रभाग कार्यक्षेत्रातील भागाची अधिका-यांसमवेत पाहणी केली.
कचरा हस्तांतरण केंद्र,कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या ,कचरा विलगीकरण व्यवस्थापन तसेच त्यासाठी ओला कचरा प्रक्रिया करणाऱ्या काही गृह निर्माण संस्थांना देखील अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी भेटी दिल्या. यावेळी आरोग्य विभाग प्रमुख रविकिरण घोडके, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात तसेच सहाय्यक आरोग्याधिकारी उपस्थित होते.
Advertisement
आरोग्य विभागामार्फत शहरात पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभाग रविकिरण घोडके यांनी दिली.