शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
हिरा सामाजिक शिक्षण संस्था संचलित सिध्दिविनायक पब्लिक स्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन कै. अंकुशराव लांडगे नाटयगह भोसरी येथे नुकतेच संपन्न झाले. स्नेहसलेनाच्या उदघाटन प्रसंगी माजी महापौर मा.. श्री राहुलदादा जाधव, मा. श्री कार्तिक लांडगे, मा. श्री कुंदन गायकवाड, मा. श्री पांडाभाऊ साने, संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ निर्मलाताई जाधव, संस्थेचे सचिव मा. श्री मारुती जाधव, मा. श्री ढमालेदादा व मां श्री अंबादास गायकवाड उपस्थित होते.
शै. वर्ष २०२२ – २०२३ मध्ये चमकदार कामगिरी करण्यात आलेल्या इ. नर्सरी ते ११ वी तील गुणवंत व आदर्श विदयार्थी इ.५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन केलेल्या विदयार्थ्याना प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते ट्रॉफी व पदके देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण इंग्रजी माध्यमातून कु. वेदिका विठठल सूर्यवंशी आणि मराठी माध्यमातून कु. हिमानी प्रितमलाल चौधरी या विदयार्थीनी ची उत्कृष्ट विदयार्थी म्हणून निवड करण्यात आली तसेच त्यांना वर्षभर मोफत शिक्षण देण्याची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. निर्मलाताई जाधव यांनी केली. या विदयार्थीनीना प्रमुख अतिथींच्या हस्ते टॉफी देऊन गुण गौरव करण्यात आला. तसेच इ. ७ वी तील विदयार्थी चि. राज मारुती जाधव याने जिल्हास्तर राज्यस्तर राष्ट्रिय व आंतरराष्ट्रिय स्तरावर मर्दानी खेळात गोल्ड मेडल मिळविल्यामुळे प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
तसेच शाळेतील उत्तम कामगिरी करण्या या शिक्षकांचा देखील संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. इंग्रजी माध्यमातून उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सी. बनजा नायर माध्यमिक विभाग व मराठी माध्यमातून सौ. आरती घाटे माध्यमिक विभाग यांची निवड करण्यात आली. तसेच प्राथमिक विभागातून उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सौ. दिपाली फडतरे व पूर्व प्राथमिक विभागातून सौ. रंजना कदम यांची निवड झाली. त्याचबरोबर उत्तम ऑफीस कामासाठी सौ. अर्चना डोफे व उत्तम ग्रंथपाल म्हणून सी. शितल चव्हाण यांची निवड करण्यात आली. या सर्वांचे टॉफी श्रीफळ व शाल देऊन प्रमुख अतीथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोणतेही काम असो आपले स्वलाचे काम समजून कोणालाही कोणत्याच शालेय कामाला नकार न देण्या या अश्या सर्वांच्या लाडक्या शिक्षिका सौ. प्रियदर्शनी खोमणे यांची उत्कृष्ट शिक्षिका म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांचा सन्मान मा. श्री. कार्तिक लांडगे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन करण्यात आला.
आमचे कुटुंब प्रमुख व आधारस्तंभ मा. श्री. मारुती रामचंद्र जाधव सचिव हिरा सामाजिक शिक्षण संस्था व सौ. निर्मला मारुती जाधव संस्थापक अध्यक्षा हिरा सामाजिक शिक्षण संस्था या उभयतांना शैक्षणिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामागिरी केल्यामुळे सिध्दिविनायक पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज तर्फे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक प्रशासकिय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचारी यांस कडून या उभयतांचा पुणेरी पगडी, मानपत्र , शाल, चुके व श्रीफळ देवून मा. श्री कार्तिक लांडगे, माजी महापौर मा. श्री. राहूल जाधव, ज्येष्ठ नागरिक महासंघांचे ढमालेदादा, व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. अंबादास गायकवाड व मा. श्री अरूण कुलकर्णी या सर्वांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
स्नेहसंमेलनामध्ये सिध्दिविनायक पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज च्या जवळ जवळ १००० विद्यार्थी व विदयार्थीनी सहभाग घेऊन सांस्कतिक विविध गुणदर्शन, कार्यक्रमातून विदयार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कती, भारतीय वीरांविषयीची भावना, आध्यात्मिक देवी देवता, शेतकरी, पोलीस यांविषयी कतज्ञता व्यक्त करून सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सर्वांनी सहभागी विदयार्थ्याचे खूप खूप अभिनंदन केले.
4 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. राहूल जाधव, मा. महापौर पि. चिं. म.न.पा. प्रमुख पाहुणे मा. श्री कार्तिक लांडगे, प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष व मा. स्थायी समिती अध्यक्ष पि. चिं. म.न.पा., मा. श्री कुंदन गायकवाड, श्री. आवा मोरे, पांडाभाऊ साने, जेष्ठ नागरिक सराफ दादा ढमालेदादा.. प्रियंका बारसे सामाजिक कार्यकर्ते, मा. श्री. अंबादास गायकवाड, व मा. श्री अरूण कुलकणी, संस्थेचे सन्मानिय पदाधिकारी, प्राचार्य मुख्याध्यापक तसेच पञकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दिविनायक पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य डॉ. दादासाहेव पवार यांनी केले. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. पुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी बाघ व सौ. बनजा नायर यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार मा. श्री. डॉ. दादासाहेब पवार यांनी केले. या स्नेहसंमेलनाचे नियोजन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी वाघ यांनी केले.