शबनम न्यूज | पुणे
पुण्यातील भवानी पेठ परिसरातील पालखी विठोबा चौकाजवळील मणिभवन वाड्यातील एका घराला आज दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नीलेश ठक्कर (वय.40) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Advertisement
शुक्रवारी सकाळी 12.30 च्या सुमारास मणिभवन वाडा येथील एका घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आणि तेथील रहिवाशांना बचावले परंतु, ठक्कर मात्र भाजले होते, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला.
Advertisement