शबनम न्यूज प्रतिनिधी
पिंपरी दि. ४ फेब्रुवारी 2023
चिंचवड मतदार संघातून येत्या 26 फेब्रुवारी रोजी पार पडत असलेली पोटनिवडणूक करिता महाविकास आघाडी तर्फे चिंचवड मधून राष्ट्रवादीतर्फे राहुल कलाटे उमेदवार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर कसबा मतदार संघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे
कसबा मतदार संघातून महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून चिंचवड विधानसभा मतदारसंघाकरिता राष्ट्रवादी वतीने राहुल कलाटे यांना उमेदवारी देणं संदर्भात हालचाली सुरू आहेत मागील निवडणुकीत या मतदारसंघातून निवडणूक लढवून अपक्ष म्हणून एक लाख बारा हजार मते मिळविलेले शिवसेनेचे राहुल कलाटे हे यावेळी महाविकास आघाडी तर्फे इच्छुक होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने त्यांना राष्ट्रवादीतर्फे निवडणूक रिंगणात उतरावे लागेल. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार यात शंका नाही.