शबनम न्युज | पुणे
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ शकुंतला व शांतीलाल कोठारी या दाम्पत्यास जाहीर झाला आहे. कांतीलाल मुनोत यांना ‘समाज शिरोमणी’, डॉ. सुमतीलाल लोढा यांना ‘समाजभूषण’, सुरेखा कटारिया यांना ‘समाजरत्न’, तर प्रफुल कोठारी, साधना ललवाणी यांना ‘मानवसेवा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उद्या रविवारी (दि. ५ फेब्रुवारी २०२२) सायंकाळी ५.०० वाजता सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी जैन, गुजराती, माहेश्वरी व अगरवाल समाजातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे, अशी माहिती बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी दिली.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “दरवर्षी हा पुरस्कार माझ्या आईवडील रतनबाई व बन्सीलाल चोरडिया यांच्या स्मरणार्थ जैन समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना दिला जातो. दोघेही जैन धर्माचे सर्व तत्व पालन करणारे, भारतीय संस्कृतीला मानणारे आणि सर्व समाजाच्या हितासाठी कार्यरत होते. प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल शेठ मणियार, आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, आयपीएस विनिता साहू, ऍड. अभय छाजेड, योगगुरू डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे. जैन समाजातील दहावी-बारावी व उच्च (ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट) शिक्षणात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.”