शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकी करिता महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे हे उद्या सात फेब्रुवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी पक्षाची आज संध्याकाळी बैठक पार पडली या बैठकीनंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे व त्यावेळी मीही तेथे उपस्थित राहणार आहे असे सांगितले
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप वतीने अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करीत आज दाखल केला.
उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस या दिवशी महाविकास आघाडी वतीने शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे यांनी स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात एक लाख बारा हजार मते मिळविली होती व ते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते त्यामुळे आताही निवडणूक अटीतटीची राहणार आहे.