राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे दाखल करणार आज उमेदवारी अर्ज
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकी करिता महाविकास आघाडी वतीने राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
मागील काही दिवसापासून राहुल कलाटे यांच्या नावाची चर्चा होती परंतु काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्व इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली या बैठकीत विठ्ठल उर्फ नाना काटे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार होतील याचे संकेत दिले होते.
राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटर द्वारे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे असतील अशी माहिती दिली आहे
आज माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे हे चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकी करिता दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर येथून सकाळी दहा वाजता शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढण्यात येणार आहे ही रॅली ग प्रभाग कार्यालयातील निवडणूक अधिकारी कार्यालयापर्यंत असेल या रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले