शबनम न्युज | मुंबई
चोर असल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत २९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बोरिवली पूर्व येथे गुरूवारी पहाटे घडली. प्रवीण लहाने असे मृत तरूणाचे नाव आहे.याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
प्रवीण लहाने असे मृत तरूणाचे नाव आहे. बोरिवली येथील सोसायटीमधील सुरक्षा रक्षकांसह अन्य व्यक्तींनी २५ मे रोजी पहाटे चोर असल्याच्या संशयावरून प्रवीणला मारहाण केली. त्यानंतर नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शताब्दी रुग्णालयात प्रवीणची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आकडी आल्यामुळे त्याला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले.
Advertisement