शबनम न्युज | पिंपरी
चिखली-आकुर्डी रोड वरील मुख्य आणि मोठा चौक म्हणून साने चौकाची ओळख.तसेच या चौकाची आणखी एक ओळख जी कि प्रभागातील नागरिकांना माहीतच आहे ती म्हणजे नित्याची असेलेली वाहतूक कोंडी. परंतु या वाहतुक कोंडीला कारणीभुत असणारा चौकाच्या मधेच असणारा सिमेंट चा कठडा काढण्यासाठी आम्ही वारंवार पालिका प्रशासन तसेच वाहतुक विभाग,विद्युत विभाग यांच्याशी पाठपुरावा केला.त्याचा परिणाम म्हणजे आज या चौकातील कठडा पालिका प्रशासन तसेच वाहतुक विभागाकडून काढण्यात आला.
हा कठडा काढल्याने म्हेत्रेवस्तीच्या बाजुने येणाऱ्या गाड्या ज्यांना चिखली गावात जायचे आहे ते आता विना अडथळा जाऊ शकतील त्यामुळे नक्कीच होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. कठडा निघाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आता आमची थोडी का होईना पण ट्रॅफिक मधुन मुक्ती होईल असा विश्वास व्यक्त केला.