शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेच राष्ट्रवादीचे उमेदवार राहणार शरद पवार यांची घोषणा
शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे बैठकीत शरद पवार यांनी स्पष्ट केले, पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे राहतील अशी घोषणा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत केली. मागील काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार कोण याबाबत चर्चा रंगल्या होत्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते यावरून या चर्चा सुरू झाल्या होत्या.
आगामी लोकसभा निवडणुकी करिता राष्ट्रवादीकडून मला उमेदवारी मिळावी अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली होती त्याचं उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी सांगितले होते की मी अजून मैदान सोडले नाही त्यामुळे राष्ट्रवादीत वादविवाद असल्याचे सांगितले जात होते परंतु खुद्द शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.