पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालये नोंदणी व नूतनीकरण ऑनलाईन संगणक प्रणालीचे अनावरण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले महापालिका स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत दि. ०६.०६.२०२३ पासून महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी दवाखाने व रुग्णालयांची नोंदणी, नोंदणी नुतनीकरण तसेच केलेल्या नोंदणीमध्ये बदल करणे इत्यादी करीता ऑनलाईन संगणक प्रणाली उपलब्ध करून देणेत येत आहे, महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर सदर नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, सदर नोंदणी प्रक्रिया करताना संबंधित रुग्णालयाने अधिकृत व्यक्तीच्या नावाने ऑनलाईन खाते तयार करून त्यानुसार महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेला अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरावयाचा आहे. सदर अर्ज भरताना0 सर्व कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावयाची आहेत. शहरातील सर्व प्रमुख भाग हे मनपाच्या आठ प्रमुख रुग्णालयांच्या अंतर्गत समाविष्ठ करणेत आलेले आहेत. रुग्णालय नोंदणी प्रक्रिया करताना संबंधित रुग्णालयाच्या ठिकाणानुसार महानगरपालिकेच्या आठ रुग्णालयापैकी सदर नोंदणी संबंधित रुग्णालयाच्या अंतर्गत केली जाईल. सदर प्रक्रीयेमध्ये अर्धवट, अपुर्ण असलेला कुठल्याही प्रकारचा अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार नाही.
नोंदणीसाठी रूग्णालयाकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हे नव्याने नोंदणी साठी प्रक्रिया केलेला रुग्णालयाला भेट देऊन त्यातील निरीक्षणे, अभिप्राय हे ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदवतील, स्थळ पहाणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित रुग्णालय नोंदणी प्रक्रियेचे शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणेसाठी व अंतिम टप्प्यासाठी सदर प्रकरण हे मुख्य कार्यालयाकडे वर्ग केले जाईल, मुख्य कार्यालयामध्ये वैद्यकीय विभाग त्या रुग्णालयाच्या उपलब्ध सेवा सुविधेनुसार त्याचे अंतिम दर नोंद करून मागणी चलण रुग्णालयाला उपलब्ध करून देतील, रुग्णालयाने आपली नोंदणी प्रक्रियेचे शुल्क ऑनलाईन केल्यानंतर, आरोग्य वैदकिय अधिकारी यांच्या लॉगिनद्वारे अंतिम प्रमाणपत्र जनरेट करून संबंधित रुग्णालयाला त्याच्या लॉगिन मध्ये ते उपलब्ध असेल. सदर प्रमाणपत्राची सत्यता पडताळणीबाबत QR Code सुविधा उपलब्ध करून देणेत आलेली आहे. नोंदणी प्रक्रिये मधील सर्व टप्प्याची माहिती ही एसएमएस द्वारे संबंधित रुग्णालयाच्या व्यक्तीस कळविली जाणार आहे, मनपाचा वैद्यकीय विभाग यापुढे मॅन्युअल नोंदणी प्रक्रिया ही पूर्णपणे बंद करून या पुढील सर्व अर्ज फक्त ऑनलाईन सिस्टीम द्वारेच स्वीकारले जाणार आहेत, संबंधित रुग्णालय व मनपाचा वैद्यकीय विभाग यांना नोंदणी प्रक्रियेमधील एखाद्या रुग्णालयाचा अर्ज हा कुठे येऊन थांबला आहे किंवा त्याची सद्यस्थिती काय आहे हे डॅशबोर्ड वरून पाहता येईल.
सदर संगणक प्रणालीबाबतची माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी दिली. सदरची सेवा शहरातील दवाखाने, रूग्णालयांकरीता उपलब्ध करून देणेकरीता सदर सेवेचा शुभारंभ मा. श्री. शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे हस्ते आज दि. ०६.०६.२०२३ रोजी करण्यात आला.