पिंपरी, दि ६ जून २०२३:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत ‘’अमृत’’ गटात आणि ‘’हरित आच्छादन व जैवविविधता’’ प्रकारात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अव्वल ठरली. यासाठी महापालिकेस अनुक्रमे ८ कोटी आणि २ कोटी असे एकूण १० कोटी रुपये बक्षीस मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी पालिकेच्या वतीने मुंबई येथे सन्मान स्विकारला. या अभियानासाठी महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी महत्वाचे योगदान दिले. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आज झालेल्या स्थायी समिती सभेत सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , जितेंद्र वाघ तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख
उपस्थित होते.
सत्कारार्थींमध्ये पर्यावरण विभागाचे उपअभियंता योगेश आल्हाट, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, यांत्रिकी विभाग कार्यकारी अभियंता कैलास दिवेकर, विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता दिपाली धेडे, बांधकाम परवानगी विभाग कनिष्ठ आभियंता अमोल पडलवार, पर्यावरण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनिश ओक, ग क्षेत्रिय कार्यालय शिपाई संजय तलारे, उद्यान विभाग वाहनचालक अरूण पोमणे, केपीएमजी सल्लागार विराट राजपूत, ह्युमन मॅट्रिक्स सिक्युराईट सल्लागार विशाल सुर्वे यांचा समावेश आहे.