शबनम न्यूज / मुंबई
कोरोना महामारीच्या अभुतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून द्यावे, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जिल्हा, तालुका पातळीवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन केले होते.
Advertisement
या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- कुलाबा तालुका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुलाबा तालुका जिल्हाध्यक्ष विजय वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष मनोज अमरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे देखील उपस्थित होते.