शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील तिरुपती चौक येथे भाजप नगरसेविका नम्रता योगेश लोंढे वसामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांच्या नेतृत्वात या प्रभागातील व्यापारी असोसिएशन वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिकेने लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन विरोधात आंदोलन केले, या आंदोलनाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, यांना काल निवेदन देण्यात आले होते .
या निवेदनात नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांनी नमूद केले होते की पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जो आपण लॉकडाऊन केले आहे ते व्यापाऱ्यांच्या जीवाशी खेळ करणारे आहे आधीच व्यापारी लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत अशा परिस्थितीत बँका सुद्धा कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत यातून व्यापारी हताश होऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतील त्यामध्ये आपण हे लॉकडाऊन व निर्बंध लावून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहात अशी भावना व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे याकरिता लॉक डाऊन चे निर्बंध आपण जे लावले आहेत ते व्यापाऱ्यांना मान्य नाहीत शासनाने दिलेले नियम व्यापारी काटेकोरपणे पालन करण्यास तयार आहेत व्यापारी वर्ग योग्य ती काळजी घेऊन व्यवसायिक करतील अशी आम्ही गवाही देतो जर आपण यावर योग्य ते निर्णय घेतले नाही तर व्यापारी निषेध म्हणून दुकानांसमोर निषेधाचे फलक घेऊन उभे राहून आंदोलन करतील असा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर आज तिरुपती चौक येथे या प्रभागातील सर्व व्यापारी वर्गाने लॉक डाऊन चा निषेध करत आंदोलन केले.