शबनम न्यूज / पिंपरी
ब्रेक दि चैन या मोहिमेत सर्व व्यापाऱ्यांनी संयम ठेवून सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक एडवोकेट सचिन भोसले यांनी केले आहे या ब्रेक दि चैन मोहिमेअंतर्गत राज्य सरकारने कोरोना ला हद्दपार करण्यासाठी काही कडक निर्बंध घातले आहेत त्यासाठी व्यापारी नागरिक या सर्वांचे सहकार्य मोलाचे आहेत कोरोना ला हद्दपार करण्यासाठी राज्यातील तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी एकजुटीने लढा देण्याची आवश्यकता आहे ब्रेक दि चैन या मोहिमेतील कडक निर्बंध च्या आड काही प्रवृत्ती माथी भडकविण्याचे काम करत असल्याचे ही शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले यांनी सांगितले आहे.
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सचिन भोसले यांनी सांगितले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अहोरात्र कोरोना ला हद्दपार करण्यासाठी झटत आहेत अतिशय वेगाने रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असताना कडक नियमांचे पालन करणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे शहरातील नागरिकांच्या जीविताला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये माथी भाकविणाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जोपासना करून राज्य सरकार तसेच प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे कोरोना ला हरविण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी एक विचाराने ही लढाई लढणे गरजेचे आहे यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख, नगरसेवक सचिन भोसले यांनी केले आहे