शबनम न्यूज / पिंपरी
कोरोना वर जीवनदान असणारे औषध रेमडेसिवीर इंजेक्शन महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते, नगर सेवक नाना काटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली आहे .
आपल्या मागणी पत्रात नाना काटे यांनी नमूद केले आहे कि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच महापालिकेच्या हॉस्पिटल मध्ये गोरगरीब रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. कोरोना विषाणूवर जीवनदान ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन हे प्रभावी इंजेक्शन आहे परंतु सध्या राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चा तुटवडा जाणवत असल्याने तसेच शहरातील गोरगरीब नागरिक आधीच आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांना हे इंजेक्शन विकत घेणे परवडणारे नाही. याचा विचार करता करोना रुग्णांसाठी जीवनदान ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन महानगरपालिकेतर्फे मोफत पुरवठा करून नागरिकांनसाठी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे.
नागरिकांची गैर सोय पाहता त्यांना वेठीस न धरता आयुक्तांनी आपल्या अधिकारात शहरामधील गरजू नागरिकांनसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय तत्काळ घेवुन रेमडिसेवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे माजी विरोधी पक्ष नेते, नगर सेवक नाना काटे यांनी केली आहे