पुणे, दि. 8 : पुणे विभागातील 7 लाख 28 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 लाख 47 हजार 905 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 1 हजार 913 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 17 हजार 887 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.11 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.87 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 4 हजार 37 रुग्णांपैकी 5 लाख 9 हजार 278 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 84 हजार 449 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 310 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.71 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.31 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 69 हजार 653 रुग्णांपैकी 62 हजार 32 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 711 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 910 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 67 हजार 54 रुग्णांपैकी 57 हजार 787 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 225 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 888 रुग्णांपैकी 48 हजार 997 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 64 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 827 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 273 रुग्णांपैकी 50 हजार 11 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 464 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 798 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 12 हजार 935 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 10 हजार 907, सातारा जिल्ह्यात 566, सोलापूर जिल्ह्यात 794, सांगली जिल्ह्यात 380 तर कोल्हापूर जिल्ह्यात 288 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा–या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 9 हजार 35 आहे. पुणे जिल्हयामध्ये 7 हजार 832, सातारा जिल्हयामध्ये 197, सोलापूर जिल्हयामध्ये 702, सांगली जिल्हयामध्ये 215 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 89 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 52 लाख 39 हजार 485 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 8 लाख 47 हजार 905 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.