यमुनानगर येथील रस्ते डांबरीकरण करण्याची मागणी
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग 13 यमुनानगर येथील रस्ते डांबरीकरण करण्याची मागणी शिवसेना पुणे जिल्हा संघटिका (प्रमुख ) मा. विरोधी पक्षनेता पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुलभ उबाळे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे केली आहे दिलेल्या निवेदनात सुलभ उबाळे यांनी नमूद केले आहे कि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 यमुनानगर या प्रभागातील नागरिक गेली 2 वर्ष रस्ते खोदाईमुळे त्रस्त झाली असून दर आठवड्यात कोणता ना कोणता रस्ता, ड्रेनेज, पाणी पुरवठा, केबल, टाकण्याच्या नावाखाली खोदला जात आहे रस्ता खोदून झाला की तात्पुरती मलम पट्टी म्हणून त्या ठिकाणी अत्यन्त निकृष्ठ दर्जाचे डांबर टाकून तो बुजवला जातो व तोच रस्ता पुन्हा इतर कोणत्या तरी कारणासाठी खोदला जातो यामुळेच यमुनानगर, खड्डे नगर झाले असून आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून त्वरित रस्ते डांबरीकरण करण्याचे आदेश स्थापत्य विभागास द्यावेत अशी मागणी सुलभ उबाळे यांनी केली आहे.