शबनम न्युज / मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेण्यापूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळी या सगळ्या घटकांशी चर्चा करीत आहे. तसेच आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आमदार रोहित पवार यांच्या सोबत ऑनलाईन संवाद साधला.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत रोहित पवार म्हणाले कि, ऑनलाईन परीक्षा म्हणजे घरी बसून नाही तर त्यासाठीही परीक्षा केंद्रावर जाव लागणार आहे. त्यामुळं जूनमध्ये का होईना ऑनलाईनऐवजी नेहमीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेणंच योग्य होईल. यामुळं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केली जाणार नाही आणि भविष्यात त्यांना अडचणही येणार नाही.
मुलांची शाळा हेच त्यांचं परीक्षा केंद्र असेल त्यामुळं त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावं लागणार नाही. दरम्यान,परिक्षेपूर्वी या प्रक्रियेतील सर्वांचं लसीकरण करावं व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही केंद्र सरकारशी चर्चा करावी.निकाल वेळेवर लावण्यासाठीही आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. असे यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
आजच्या परिस्थितीत परीक्षा घेणं ही केवळ शिक्षण विभागाची जबाबदारी नाही तर त्यासाठी इतर सर्व विभाग, विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड योग्य निर्णय घेतील, असा विश्वास ही आमदार रोहित पवार यांनी दर्शविला आहे