शबनम न्युज / पिंपरी
प्रत्येक कामात स्वतः जातीने लक्ष घालुन प्रभागातील कामे पाठपुरावा करून पूर्ण करून घेण्यात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या नगरसेविका प्रियांका बारसे यांचा हात कोणीच धरू शकत नाही.
नुकतीच प्रभागातील डांबरीकरण कामास त्यांच्या नेतृत्वाखाली जोरात सुरुवात झालेली आहे.
त्याचे नियोजन नगरसेविका बारसे यांनी स्थापत्य विभागाचे अधिकारी अभियंते यांना स्वतः कार्यालयात नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन त्या पद्धतीने काम करण्याच्या सूचना सर्वांना दिलेल्या आहेत.
सध्या प्रभागातील संत ज्ञानेश्वर हाउसिंग सोसायटी, राष्ट्रप्रेम नगर, मातोश्री पार्क ,स्वयंभू गणपती मंदिर, पारिजात कॉलनी,हुतात्मा चौक या ठिकाणची कामे या आठवड्यात पूर्ण करण्याचे त्यांचे उद्दीष्टय आहे.
कोरोनाच्या काळातही धडाडीने काम करणाऱ्या त्या एक महिला नगरसेविका म्हणून प्रभागात प्रसिद्ध आहे .स्वत:बरोबरच त्या इतरांची ही काळजी घेतात.आणि कामासाठी प्रभागात फिरताना त्या त्या परिसरात कोरोनाबाबत जनजागृती करून शासनाने सांगितलेल्या नियमांची नागरिकांना आठवण करून देत असतात.
नागरिकांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांच्या पाठीशी नेहमीच असतात.