शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी, दि. ९ एप्रिल २०२१ – कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा साठा उपलब्ध झाल्याने उद्या दि. १० एप्रिल २०२१ रोजी शहरातील लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात ५९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर २८ खाजगी लसीकरण केंद्रामार्फत देखील व्यक्तींना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. आजपर्यंत शहरातील एकुण २ लाख ३० हजार ८६९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार लसीकरण केले जात आहे.
Advertisement