शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी, दि.९ एप्रिल २०२१ – पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक 2 जाधव वाडी ,कुदळवाडी येथे महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकाम व पत्रा शेड वर कारवाई केली सदर कारवाईमध्ये जाधव वाडी, कुदळवाडी मधील गट क्रमांक १४ लगतच्या कुदळवाडी रस्त्यावरील पत्रा शेड, जाधवाडी कुदळवाडी येथील एकूण 12 ,पत्रा शेड व विविध बांधकामे असे एकूण अंदाजे क्षेत्रफळ सात हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली .सदर कारवाई सहशहर अभियंता मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुर्यकांत मोहिते तसेच त्यांच्यासोबत महापालिकेचे तीन कनिष्ठ अभियंता १० वीट निरीक्षक, अतिक्रमण पथक, एक पी एसआय, पंधरा पोलीस ,आठ मजूर ,दोन जेसीबी दोन डंपर यांच्या या सहकार्याने सदर कारवाई करण्यात आली