मुख्यमंत्री, मनपा.आयुक्त, व स्थायी समिती सभापती यांना पत्र
आर्थिक मदत ही संबंधितांच्या बँक खात्यात जमा करावी – आमदार लक्ष्मण जगताप
शबनम न्यूज / चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी या कोरोना प्रादुर्भावा च्या धर्तीवर लॉक डाउन काळात आर्थिक दुर्बल घटकातील वर्गाला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे त्यांनी निवेदन पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती नितीन लांडगे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे
दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की हा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला असून या काळात शहरातील रिक्षा चालक, चर्मकार, नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे चालक इत्यादी या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील व्यवसाय करणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी प्रमाणे सद्यपरिस्थितीत सर्वत्र कोरोना ने थैमान घातले असून राज्यात संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे अशा परिस्थितीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्यात कडक लॉक डाउन चा निर्बंध करण्यात आल्याने हातावर पोट असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील रिक्षाचालक, चर्मकार ,नाभिक, शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे चालक अशा असंख्य कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे पारंपरिक व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांचे संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहे अशा अडचणीच्या काळात शहरातील मानसिकदृष्ट्या खचलेल्या या घटकाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी जेणेकरून लॉक डाऊन मुळे संपूर्ण व्यवसाय उध्वस्त होणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील वर्गाला दिलासा मिळेल आपल्या स्तरावरून देण्यात येणारी आर्थिक मदत ही संबंधितांच्या बँक खात्यात जमा करावी असे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन ईमेल केले आहे. राज्य सरकारने सुद्धा राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. ही मदत संबंधित कुटुंबाच्या बँक खात्यात थेट जमा करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.