शबनम न्यूज / पुणे
पुणे जिल्हा परिषद पुणे,कृषी विभाग यांच्या वतीने नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत ऍग्रो अँबुलन्स कृषी विषयक जनजागृती उपाय या गाडीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला,
यावेळी जि प अध्यक्षा निर्मलाताई पानसरे,जुन्नर आमदार-अतुलशेठ बेनके,उपाध्यक्ष-रणजित शिवतारे, कृषि व पशु सभापती-मा.बाबुराव आप्पा वायकर,CEO आयुष प्रसाद,Ad.CEO भारत शेंडगे,जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख इत्यादी प्रमुख मान्यवर तसेच kvk.नारायणगाव अनिलतात्या मेहेर,मुख्य शास्त्रज्ञ-शेटे सर, पशुधन अधिकारी डॉ.शिवाजी विधाटे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव,जुन्नर या ठिकाणी माती व पाणी परिक्षण साठी नवीन गाडी व आवश्यक उपकरणे उपलब्ध करन्यात आली,त्या मध्ये मावळ,मुळशी,खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरूर या ६ तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या बांधावर ऍग्रो आंबूलन्स ह्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा चा फायदा होऊन किड व रोगांच्या व्यवस्थापन बाबतीत वेळीच अभ्यास करून उपाय करण्यात येणार आहे व त्या अनुषंगाने शास्त्रज्ञांकडे शिफारस करतील व नुकसान कारक कीड ओळख करून दिली जाईल तसेच रासायनिक खतांचा योग्य वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल,कीड व रोग यांच्या वर पर्यावरण पूरक उपाययोजना पध्दत सुचवली जाईल तसेच दर वर्षी मे जून मध्ये कृषी विधान केंद्र मार्फत जनजागृती कार्यक्रम राबविले जातात,त्या मध्ये या सर्व बाबीचे शेतकय्रांना माहिती देऊन योग्य त्या खबरदारी उपाय केले जातील व याचा संपूर्ण फायदा मावळ,मुळशी,खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरूर या तालुक्यातील माझ्या कष्टकरी तसेच शेतीत सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या माझ्या बळीराजाला होईल अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती मा.बाबुराव आप्पा वायकर यांनी दिली.