शबनम न्यूज / सातारा
महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी दोन दिवसीय कडक लॉक डाऊन जाहीर केला या लॉकडाउन ला विरोध करण्यासाठी सातारा चे खासदार उदयनराजे भोसले यांनी रस्त्यावर बसून भीक मांगो आंदोलन केले.
या महाराष्ट्र सरकार मध्ये इच्छाशक्ती नाही, आज राजेशाही असती तर या परिस्थिती पर्यंत आपण पोहोचलो नसतो, सगळीकडे भ्रष्टाचार सुरू आहे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी covid-19 चे लसीकरण सुरू करण्यात आले आहे परंतु काही जणांना लसीकरण केल्यानंतरही कोरोना चा प्रादुर्भाव झालेला आहे, सरकारने नुसता बाजार मांडला आहे, सरकार लॉक डाऊन करून गोरगरिबांचे नुकसानच करीत आहे, गोरगरीब सामान्य जनतेला अडचणीत आणणाऱ्या या लॉक डाऊन चा मी निषेध करत असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
Advertisement