शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी,१० एप्रिल:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क व इ क्षेत्रीय कार्यालयातील भोसरी रूग्णालयाकरीता भोसरी एमआयडीसीतील फोरसिया कंपनीच्या वतीने कोरोनावर मात करण्यासाठी सीएसआर अंतर्गत वैद्यकिय उपकरणे देण्यात आली.क क्षेत्रीय अधिकारी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,राजेश आगळे व जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॅा शैलजा भावसार यांनी कंपनीचे प्रतिनिधी जितेंद्र निखळ यांच्याकडून स्वीकारली.
पिंपरी चिंचवड शहरातील विविध सेवाभावी संस्था व कंपन्या महानगरपालिकेच्या या कोरोना लढाईत सहभागी होत आहेत.फोर्सीया कंपनीच्या वतीने कोरोना रूग्णांचे तपासणीसाठी आवश्यक ॲाक्सिमीटर,थरमल गनसह विविध दहा प्रकारची वैद्यकीय उपकरणे महापालिकेकडे सूपूर्त केली. सीएसआर अंतर्गत फोर्सीया कंपनीने केलेल्या मदतीबद्दल सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.
Advertisement