शबनम न्यूज / मुंबई
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली महाराष्ट्र राज्यात आठ दिवसांच्या लॉक डाउन चे संकेत या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले याबाबतचा निर्णय दोन दिवसात घेणार असल्याचेही संकेत उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिले या बैठकीमध्ये लॉक डाउन बाबत एकमत झाले आहे त्यामुळे उद्या टास्क फोर्स ची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक संपली आहे या बैठकीत सामान्यांच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनवण्यात येणार आहे राज्यामध्ये कोरोना चा आकडा सव्वा पाच लाखांवर गेला आहे यामुळे तातडीने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे एकीकडे हा विषय असताना
सामान्यनागरिकांन वरील संकटही आहे मुख्यमंत्री दोन दिवसात रोडमॅप तयार करणार आहेत ती झाल्यानंतर कडक लॉकडाउन करण्यात येईल नंतर हळू हळू हे निर्बंध शिथिल करण्यात येतील असे आजच्या बैठकीत ठरले
राज्यातील कोविड परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रमुख पक्षांचे नेते व मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांची या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे :
कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने विचार सुरू आहे.
कोरोना सर्वांनाच टार्गेट करीत आहे. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागात आणि क्षेत्रात आहे. त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो.
सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्यास सहकार्य द्यावे
रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल
सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्यास सहकार्य द्यावे
रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 10, 2021
Advertisement