शबनम न्यूज / पुणे
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे शहरासाठी ऑक्सिजनसह अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. पुणे शहरातील रुग्ण सेवेत ही रुग्णवाहिका दाखल झाली आहे.
Advertisement
विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबराव वायकर, श्री प्रताप निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisement