शबनम न्युज / पिंपरी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर हिराबाई नाणी घुले, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त आशादेवी दुरगडे,जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, गणेश भोसले आदी उपस्थित होते.
तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार उपक्रमांतर्गत प्रबोधन पर्व ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात येत आहे याचे उद्घाटन यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर हिराबाई नाणी घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त आशादेवी दुरगडे आदी उपस्थित होते.