विभागात कोरोना बाधित 8 लाख 87 हजार 627 रुग्ण –विभागीय आयुक्त सौरभ राव
शबनम न्युज / पुणे
पुणे विभागातील 7 लाख 53 हजार 542 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 लाख 87 हजार 627 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 15 हजार 881 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 18 हजार 204 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.05 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.89 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 36 हजार 16 रुग्णांपैकी 5 लाख 31 हजार 98 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 94 हजार 387 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 83.50 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 72 हजार 478 रुग्णांपैकी 62 हजार 983 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 559 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 936 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 70 हजार 38 रुग्णांपैकी 59 हजार 543 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 405 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 67 रुग्णांपैकी 49 हजार 661 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 565 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 841 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 28 रुग्णांपैकी 50 हजार 257 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 965 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 806 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 12 हजार 750 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 864, सातारा जिल्ह्यात 1 हजार 87, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 77, सांगली जिल्ह्यात 411 तर कोल्हापूर जिल्ह्यात 311 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 8 हजार 330 आहे. पुणे जिल्हयामध्ये 7 हजार 30, सातारा जिल्हयामध्ये 338, सोलापूर जिल्हयामध्ये 658, सांगली जिल्हयामध्ये 227 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 77 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 54 लाख 31 हजार 393 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 8 लाख 87 हजार 627 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.