शबनम न्यूज / मुंबई
उद्या पित्ताशयावर होणार शस्त्रक्रिया…
मुंबई दि. ११ एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेबांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
Advertisement
पवारसाहेबांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती त्यानुसार आज दाखल करण्यात आले असून उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले