शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड – रेमडीसीवर इंजेक्शन मिळण्यासाठी दिलेला कंट्रोल रूम चा नंबर सतत व्यस्त असल्याकारणाने, दूरध्वनी क्रमांकाची संख्या वाढविण्या बाबत तसेच संबंधित इंजेक्शन सर्वांना मिळेल याची तरतूद करण्याबाबत व त्याचा काळाबाजार होणार नाही याची काळजी घेण्याबाबत चे निवेदन माजी खासदार गजानन बाबर यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदन नमूद केले आहे कि कोरोना ने पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरश थैमान घातले आहे अशा परिस्थितीमध्ये रेमडीसीवर इंजेक्शन हे अत्यंत उपयुक्त ठरत असून त्याचा खूप तुटवडा भासत आहे तसेच ह्या इंजेक्शनचे काळा बाजार होण्याचे प्रकार पुणे जिल्ह्यामध्ये वाढत आहेत . तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळण्यासाठी आपल्या जीवाचे रान करावे लागत आहे आज आपण जर पाहिले तर हे इंजेक्शन सहजासहजी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे तसेच आपण यासाठी कंट्रोल रूम नंबर 020-26123371 जाहीर केला आहे परंतु हा नंबर सुद्धा बहुतांश व्यस्त लागत असून नागरिक हैराण झाले आहेत
तरी आपण नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी कंट्रोल रूम नंबर की संख्या वाढवावी जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना अधिकारीवर्ग सहजासहजी उपलब्ध होतील व रेमडेसिविर सारखे इंजेक्शन मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत होईल तसेच ह्या इंजेक्शनचा काळा बाजाराची प्रमाण वाढले आहे असे वर्तमानपत्रातून ही कळते तरी यावरही आपण योग्य त्या उपाययोजना कराव्यात व नागरिकांना रुग्णांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर इंजेक्शन कसे उपलब्ध होईल याची आपण काळजी घ्यावी असे माजी खासदार गजानन बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे