शबनम न्यूज / मावळ
पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया उपाध्यक्ष निखिल पडळकर याने फेसबुक वरील सदरातील कमेंट बॉक्स मध्ये काल मा. आमादार सुनिल आण्णा शेळके यांच्या वर असभ्य भाषेमध्ये बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. सदर व्यक्ती ही वारंवार समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो.
कालचा प्रकार हा अत्यंत निंदनीय असून असल्या प्रवृत्तीवर गुन्हा दाखल होवून योग्य ते कडक शासन व्हावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष संजय शेडगे यांनी इशारा दिला आहे. सदर व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले..
याप्रसंगी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष संजय शेडगे मा सरपंच दत्तात्रय पडवळ उपाध्यक्ष मंगेश जाधव, सरचिटणीस शंकर मोढवे, उपाध्यक्ष विशाल पाठाडे, आंदर मावळ अध्यक्ष राजेश पानसरे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सोशल मिडियाचे देहू शहर अध्यक्ष अमित घेनंद यांनी हि दिले निवेदन
याच अश्या चे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सोशल मिडियाचे देहू शहर अध्यक्ष अमित घेनंद यांनी दिले आहे निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. सदर व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी देहूरोड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले..
याप्रसंगी शहराध्यक्ष प्रकाश हगवणे , महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस कामगार सेलचे उपाध्यक्ष योगेश जाधव, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस उपाध्यक्ष माणिक जाधव, युवा नेते विशाल काळोखे, प्रसिद्धी प्रमुख विशाल परदेशी, युवक अध्यक्ष योगेश मोरे मीडिया सेल अध्यक्ष अमित घेनंद , माजी युवक अध्यक्ष योगेश परंडवाल,सरचिटणीस शैलेश चव्हाण, प्रशांत बेंडभर , संदिप गार्डी, सचिन इंगवले, ऋषी चव्हाण,गणेश भोजने,नवनाथ विधाटे,हेमंत सपकाळ आदी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होेते.