शबनम न्यूज / पिंपरी
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात रक्ताचा आणि प्लाझ्माचा तुटवडा भासत आहे. आरोग्यमंत्री आणि राज्य सरकारने देखिल विविध सामाजिक संस्थांना रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विविध ठिकाणी महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त 11 एप्रिल ते 14 एप्रिल रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि 14 एप्रिल) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहर कॉंग्रेसच्या वतीने ‘कोविड मदत व सहाय्य केंद्र’ रविवार पासून ‘सज्जी वर्की जनसंपर्क कार्यालय, साई इन्कलेव्ह, विजयनगर, काळेवाडी, पिंपरी’ येथे सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी बुधवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी उपस्थित रहावे. तसेच सर्व फ्रंटल विभाग व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. सर्वांनी शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. सोशल डिसटन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा असेहि आवाहन कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे.