शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
शबनम न्यूज / मुंबई
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तर त्यामुळे आता दहावीची परीक्षा जून मध्ये तर बारावीची परीक्षा मेअखेरीस होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
📢 Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. #PariskhaPeCharcha #HSC #SSC #exams (1/5) pic.twitter.com/cjeRZAT7ux
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2021
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.त्याबरोबरच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या शालांत परीक्षाबाबत गेल्या काही दिवसांमध्ये मोठी चर्चा पाहायला मिळत होती. राज्य सरकारने एमपीएससीची 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्या नंतर आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे.