शबनम न्यूज / पिंपरी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रसह पिंपरी चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच शहरात रक्तपेढीचा अपुरा पुरवठा भासू लागला.
पुढे हे लक्षात येताच 9 एप्रिल ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं.चिं शहर (जिल्हा) व शहराध्यक्ष श्री.संजोगभाऊ वाघेरे-पाटील यांच्या माध्यमातून कोरोना रूग्नांच्या मदतीसाठी भव्य रक्तदान शिबीर आयोजत करण्यात आले होते या शिबिरात 127 रक्तदात्यानी रक्तदान केले होते या नंतर आज 12 एप्रिल ला राष्ट्रवादी काँग्रेस भाषण वर्गाने देखील हा उपक्रम हाती घेतले. हे शिबीर पिंपरी, खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 30 पिशवी रक्तदान झाले.
रक्तदान शिबीरांचे उद्घाटन
संजोग वाघेरे(राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष),यांच्या हस्ते उद्घाटन तसेच राजू मिसाळ (विरोधी पक्षनेते),कविता आल्हाट (पुणे जिल्हा पक्ष निरीक्षक), विजय लोखंडे ( शहराध्यक्ष ओबीसी विभाग ),माजी नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी भाषण वर्गाचे प्रशिक्षक हरीश मोरे, पल्लवीताई पांढरे, स्वप्नाली आसोले, शिल्पाताई बिडकर, संगीताताई आहेर, संगीताताई वाळके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीतदादा आल्हाट, स्वागत मनिषा ताई गटकळ, प्रस्तावना ॲड.सचिन औटे (प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग ) तर आभार ज्योतीताई निंबाळकर यांनी मानले ,संगीता कोकणे, बाळासाहेब पिल्लेवार,सुलेमान मामू शेख, सुगंध पाषाणकर,ज्योती गोफणे, संगीता जाधव, सिंधू जाधव,यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न झाले.