शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना सुरू आहेत. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणालाही नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. परंतु तरीही कोरोना बाधितांचा वाढणारा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. पिंपरी-चिंचवड शहरात सोमवार १२ एप्रिल दुपारी चार वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिलेल्या माहितीनुसार, कोरोना बाधित नवीन २१८८ रुग्ण आढळले असून दिवसभरात ३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोमवार पर्यंत कोरोना बाधित एकूण १६९९६४ इतके झाले असून सोमवार पर्यंत एकूण कोरोनामुक्त रुग्ण एक लाख 42 हजार 464 इतके झाले आहे. तर सोमवार पर्यंत ३०९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शासन-प्रशासन वतीने काटेकोर नियम पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांनी काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, तरी नागरिकांनी शासनाचे दिलेले नियम पाळावे व प्रशासनास सहकार्य करावे ,असे आवाहन करण्यात येत आहे.