शबनम न्युज / पुणे
“ लस तुमची जबाबदारी आमची “ या अभियानाची पुणे शहर भाजपाच्या वतीने आज सुरुवात करण्यात आली.
पुणे शहरात वाढणाऱ्या कोरोना साथीच्या भयावह प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागरिक आणि प्रशासन अखंड प्रयत्न करत आहेत. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी संपूर्ण देशात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी दि. ११ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात लसीकरण उत्सव करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. भाजपा शहर अध्यक्ष मा. जगदीशजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पुणे शहराच्या वतीने नागरिकांना लसीकरण नोंदणी करणे आणि प्रत्येकाच्या सोयीच्या लसीकरण केंद्रात वेळ ठरवता यावी यासाठी जंगली महाराज रस्ता येथील पुणे शहर भाजपा कार्यालय येथे लसीकरण नोंदणी आणि सहाय्यता केंद्र आज चालू करण्यात आले. पुण्याचे खासदार मा. गिरिशजी बापट यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी पुण्यातील नागरिक या कोरोनाच्या साथीवर लवकरच नियंत्रण आणि विजय मिळवतील असा विश्वास मा. खासदार गिरिशजी बापट यांनी व्यक्त केला.
भाजपा शहराध्यक्ष मा. जगदीशजी मुळीक यांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचून त्यांचे लसीकरण करून घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला केले. यावेळी पुणे शहर सरचिटणीस श्री गणेश घोष, राजेश येनपुरे, कार्यालय प्रमुख संजयमामा देशमुख आणि इतर पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना सुलभपणे लसीकरणाचा लाभ घेत यावा यासाठी खालील हेल्पलाइन क्र. कार्यान्वित करण्यात आला आहे.