मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
शबनम न्युज / मुंबई
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्ववभूमीवर राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच मोठा निर्णय घेणार आहेत, त्याची नियमावली आजच जाहीर होईल, असे विधान मुंबईचे पालकमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.
Advertisement
लोकांना सोबत घेऊन, त्यांचे सल्ले घेऊन याबाबत आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी एक चांगली एसओपी लागू करायची आहे. मला असं वाटतं की, आजच याबाबतची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. असे अस्लम शेख यांनी म्हंटले आहे.