मुंबई – कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव थांबविण्या साठी महाराष्ट्र राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी सोमवारी दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर, अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे. आता राज्यात उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी रात्री 8 पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मी नाईलाजाने हे निर्बंध लादत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी सांगितले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला . राज्यातील कोरोना परिस्थितीची विदारक परिस्थिती कथन करत, लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. राज्यात कोरोना परिस्थितीचा सर्वाधिक भार वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. आपण दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पण आपल्याला कोरोनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार, राज्यात 14 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत कडक निर्बंध म्हणजेच एकप्रकारचा मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/CFhPVDEiS9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2021
- मुख्यमंत्री यांनी दिलेली नियमावली
- उद्या संध्याकाळी आठ वाजल्यापासून नियमावली लागू
- उद्या संध्याकाळपासून ब्रेक द चेन संकल्पना राबविणार
- पुढील किमान 15 दिवस संचारबंदी लागू राहील
- आवश्यक नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये
- जनतेने ठरवावे काय करावे काय करू नये
- आपण कोरोना ला मदत करायची की कोरोना शी लढणाऱ्या सरकारला आपण सहकार्य करायचे हे जनतेने ठरवायचे
आवश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना सेवा व इतर सेवा बंद राहतील - सकाळी सात ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा हे सुरू राहणार आहेत
- सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू राहतील त्या फक्त आवश्यक कामासाठी वापरल्या जातील
आरोग्य सेवा देणारे कर्मचारी, सफाई कामगार यांच्यासाठी वाहतूक सेवा सुरू राहणार त्यात रुग्णालय मेडिकल उत्पादक व वाहतूक करणारे तसेच विमा पॉलिसी कर्मचारी तसेच जीवनावश्यक वस्तू पुरविणारे यांच्यासाठी वाहतूक सुरू राहील - पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे ती सर्व सुरू राहतील
- ई-कॉमर्स , दूरध्वनी संदर्भातील सर्व कामे सुरू राहतील
- पत्रकारांना येण्याजाण्याची मुभा राहील
- पेट्रोल पंप इंधन पुरविणाऱ्या संस्था सुरू राहतील
- बांधकाम कामगारांची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकावर राहील या कामगारांची राहण्याची सुविधा व्यवसायिकांनी करावी.
- हॉटेल रेस्टॉरंट यांच्यावर पूर्वीप्रमाणेच निर्बंध राहतील
- महाराष्ट्रात या काळात गरिबांना एक महिन्यासाठी अन्नधान्य मोफत
सात कोटी गरीब नागरिकांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत मिळणार - शिवभोजन थाळी एक महिन्यासाठी मोफत मिळणार
- कोरोनाचा सामना करण्यासाठी ब्रिटन प्रमाणे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे लागणार
- आरोग्य सुविधांकरिता स्थानिक प्रशासनासाठी ३ हजार ३०० कोटी निधी बाजूला काढला आहेरुग्ण वाढ अशीच राहिली तर रेमडिसिवीरची आवश्यकता दुप्पट होणार