शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणू ने उद्रेक केला आहे या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाला कमी करण्या साठी सर्वच थरातून तुन प्रयत्न होत आहेत शहरातील सामाजिक कार्यकर्ते आकाश चतुर्वेदी यांच्या ए. के. युथ फौंडेशन वतीने मोफत कोविड अँटीजेन रॅपिड टेस्ट शिबिराचे आयोजन १४ एप्रिल रोजी एम्पायर इस्टेट येथे करण्यात आले या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते झाले , या शिबिरात ३५० नागरिकांनी मोफत कोविड अँटीजेन रॅपिड टेस्ट करून लाभ घेतला या टेस्ट शिबिरात सुब्बरबन लॅब वतीने सर्व नागरिकांची मोफत टेस्ट घेण्यात आली या वेळी सामाजिक कार्यकर्ते रविराज ताकवणे यांच्या सह एम्पायर इस्टेट चे अनेक नागरिक उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते आकाश चतुर्वेदी यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये नागरिकांनी आपल्याला कोरोना ची लक्षणे असो किंवा नसो याचा विचार न करता आपण आपल्या कुटुंबाची चाचणी करून घ्यावी असे नागरिकांना आवाहन केले होते त्यांच्या या आवाहनाला मोठ्या प्रमाणे प्रतिसाद देत नागरिकांनी या शिबिरात कोविड टेस्ट करून शिबिर यशस्वीपणे संपन्न केले.व मोफत स्वखर्चाने शिबीर आयोजित केल्या बद्दल आकाश चतुर्वेदी यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले.